मी ही कोरोना टेस्ट केली आपणही करून घ्या- नरसिंह घोणे
लातूर:(प्रतिनिधी) शहरातील सर्व ७२ पत्रकारांची व त्याच्या कुटुंबीयांची लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रॅपिड टेस्टचे आयोजन केले होते. महापौर, उपमहपौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत कोरोना टेस्ट केली गेली यात सुखद बाब म्हणजे एकही पॉझेटिव्ह पत्रकार आढळून आला नाही हा योगायोगच कोरोना टेस्ट प्रत्यकाने करून घ्यावी यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या बाहेरच्या फिरण्याने कर्तव्यावर असल्याने चिंताग्रस्त असतो. या टेस्ट रिपोर्ट मुळे सुखावेल व निश्चिंत होईल. तरी जिल्ह्यातील पत्रकारांनी टेस्ट करून घ्यावे असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे यांनी केले आहे.
0 Comments