तडका
विघ्न हर्ता
गणपती बप्पा तुम्ही ,
औंदा कसे येणार?
आम्ही तुम्हाला आता,
मास्क कोठून देणार।
दहा दिवस क्वारनटाईन,
तुम्हाला केलं जाणार।
उखळीचे मोदक आवडीचे,
आता तुम्ही कसे खाणार।
लाडूचे तर गोष्ट सोडाच,
उंदिर वहान कोठे सोडणार।
तुमचा आमुचा डिस्टन्स,
तुम्ही कसा पाळणार।
विघ्नहर्ता स्वतःला म्हणता,
कोरोणा पळवून लावणार।
जगावरील महा संकट,
तुम्ही आता दूर करणार।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी: ९५२७०६७४६७
0 Comments