चाकूर युवासेनेच्या वतीने कर्नाटक मुख्यमंत्री येदीयुरप्पाच्या पुतळ्याचे दहन
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) दि. ९ - कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनूगुत्ती गावात चौकात उभा असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवून तेथील काही समाजकंटकांनी तो पुतळा ग्रामपंचायत कार्यालयास नेऊन ठेवल्याच्या निषेधार्थ चाकूर युवा सेना व शहर युवासेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करुन मुख्यमंत्री येदीयुरप्पाच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जुने बसस्थानक येथे रविवारी दुपारी दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. या आंदोलनाच्या वेळी नगरपंचायतचे सभापती गोपाळ माने माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे ,माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख रवी शिरुरे,युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेठकर कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख किरण गायकवाड,युवा उपजिल्हाप्रमुख श्रीनीवास नरहरे, उपतालुकाप्रमुख नाथा मद्रेवार, शहरप्रमुख बाळु जाधव,शंकर शेलार,वैभव पाटील,दत्ता नरवडे,माधव निला,दत्ता कलाले,बालाजी कोरे,तीरूमल माने, संदिप आबंदे,कार्तीक यंचेवाड सह शिवसैनिक,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments