Latest News

6/recent/ticker-posts

-लेख----> विषारी दारुचे मृत्युतांडव, पंजाब हादरला 

विषारी दारुचे मृत्युतांडव, पंजाब हादरला 



पंजाब मध्ये मागील आठवडाभरात विषारी दारुने एक दोन नव्हे तर चक्क १२० जणांचे बळी घेतले. तरणतारण, बटाला, जडियाला गुरु, मुछल पिंड, अमृतसर परिक्षेत्रात मृत्युने थैमान घातले. तरणतारण जिल्ह्यात मरणाऱ्यांची संख्या जवळपास ९० आहे. अनेक कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखांचे डोंगर कोसळले. या घटनेत कोणी पती गमावला, कोणी मुलगा गमावलं, कोणी वडील गमावला तर कोणी भाऊ गमावलं ! त्यात अति मार्मिक प्रसंग असा की, याच दरम्यान एका कुटुंबातील पुरुष व्यक्तिने विषारी दारु प्राशनाने जीव गमावला. त्याचे प्रेत पाहता पत्नीने देखील जागीच प्राण सोडला. त्यांची कोवळी चार मूलं अनाथ झाली आहेत. ५, ९, ११ आणि १३ वय असणारी ही मूलं. घरात प्रेताला खांदा द्यायला कोणीच वरिष्ठ उपलब्ध नाही. चित्रपट अभिनेता सोनू सूद ने वरील बातमी ऐकली आणि त्याने पुढे येऊन चारही मुलांचे संगोपन, शिक्षणाची जवाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिले. 


बनावट दारु मुळे उद्भवलेला हा मृत्यूचित्र पाहून पंजाब राज्य हादरले. घटनेतील बळींचा आकडा मोठा असला तरी पंजाबच्या जीवनशैलीतून 'दारु' नावाचे पेयपदार्थ हद्द पार होईल याची काही शास्वती कोणी देऊ शकत नाही. पंजाब शासन देखील या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प आहे. कारण एकच ! महसूल !! आजच्या परिस्थितीत देशातील अधिकतर राज्यांच्या महसुलात 'मद्य विक्री' व्यवसायातून मिळणाऱ्या महसूलाचे प्रमाण मोठे आहे, ही वस्तुस्थिती आहे. शासकीय कामकाजाचे खर्च भागवण्यासाठी अनेकवेळा शासनाला 'रिवेन्यू' अर्थातच महसूलाची गरज भासते. म्हणूनच ऐन लॉकडाउन मध्ये विविध राज्यांमध्ये दारु विक्रीची मुभा उपलब्ध करून देण्यात आली म्हंटल्यास अतिश्योक्ति होणार नाही. 


पंजाब मध्ये विषारी दारु, बनावटी दारु किंवा रसायन मिश्रित दारु प्राशनामुळे दि. ३० जुलै रोजी पहिली घटना पुढे आली. अमृतसर जिल्ह्यातील मुच्छल गावात पाच जणांची मृत्यु झाल्याचे पहिले वृत्त झळकले. तेच दि. ३१ जुलै रोजी तरणतारण, बटाला, जडिआला गुरु येथून देखील अशाच घटना पुढे आल्या आणि मृत्युसंख्या ३९ वर पोचली. नंतर दि. १ ऑगस्ट रोजी मृतकसंख्या थेट ८६ वर होती. दि. २ ऑगस्ट रोजी मरणाऱ्यांचा अंक थेट ११२ वर चढ़ले. तेच दि. ३ ऑगस्ट रोजी मृत्यु आलेख ११९ असा होता. मग पुढे एक दोन घटनात वाढ होत गेली. घडलेला सर्व प्रकार सुमारे सवाशे कुटुंबियांना दुखांच्या सागरात नेऊन सोडणारा आहे यात शंका नाही. 


आता या प्रकरणाने पंजाबच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण केले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंघ यांच्या विरोधात त्यांच्याच कांग्रेस पक्षाचे दोन खासदार उभे असून जाब विचारत आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत शासनाने दिली. तरी लोकांचे आणि इतर राजकीय पक्षांचे समाधान होत नाही आहे. हा मुद्दा पुढील निवडणूक पर्यंत अधून मधून उपस्थित होतच राहणार, असो. 


पंजाब राज्यात व्यसनाचा मुद्दा चव्हाट्यावर असतो. अनेक वेळा व्यसनाचा मुद्दा पुढे येतो, चर्चा घडते, निर्णय काही होत नाही. शासनाने गावागावात व्यसन सोडवण्याचे केंद्र सुरु केले पण दारुचे ठेके (अड्डे) मात्र बंद केले नाहीत ! शेजारी राष्ट्रातून सीमेपार होणारी अवैध व्यसन पदार्थांची तस्करी देखील पंजाब शासनासाठी मोठे आव्हान होय. यावर मोठे अवैध व्यापार अवलंबून असे आहे. एकूणच तेथे सर्वप्रकारचे अवैध व्यसन लपून छपून होतात आणि निर्दोष लोकं त्यांच्या बळी पडतात. दूसरं, टॅक्स चोरी साठी देखील बनावटी दारुचे प्रयोग वेळोवेळी घडतात. कायद्याने टॅक्स ची रक्कम न भरता नकली उत्पादनं वीकली जातात. पंजाबच नव्हे तर इतर राज्यात देखील असले प्रकार घडतात. योगायोग म्हणा की दुर्योग, मागील वर्षी फेबुरवारी २०१९ मध्ये असाम राज्यात विषारी दारु मुळे १२० लोकांचे प्राण गेले होते. जून २०१५ मध्ये मलाड (मुंबई) येथे ३३ लोकांचे जीव विषारी दारु मुळे गेले हे लक्षात येईलच. किंवा २००९ मध्ये गुजरात मध्ये ८० लोकांचे गेलेले बळी असो. अनेक राज्यात अशा घटना कमी जास्त प्रमाणात घडतात. पण महसूलापुढे सर्व थक्क होतात. अशा वेळी महाराष्ट्रातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यात दारु व्यवसायाविरुद्ध उचलले गेलेले उपक्रमं किंवा तेथील जनतेच्या इच्छाशक्तिची मनात सराहना होते. असले कठिन प्रयोग देशातील सर्वच जिल्ह्यात अमलात आणले गेले पाहिजे. विशेष हेच की, पंजाब सारख्या राज्यातून असली संस्कृती कायमची नष्ट व्हावी हीच प्रार्थना !


 


स.रवीन्द्रसिंघ मोदी(पत्रकार,नांदेड)


Post a Comment

0 Comments