Latest News

6/recent/ticker-posts

सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटक

सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटक



उस्मानाबाद:(प्रतिनिधी) सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी काटी ता. तुळजापुर ग्रामसेवकाला उस्मानाबाद लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करून तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई असून त्यांचे शिपाई या पदाचे मंजुरीसाठी व भविष्य निर्वाह निधी चे अकाउंट ऑनलाइन करण्यासाठीचे कागदपत्रे पंचायत समिती तुळजापूर येथे पाठवण्याच्या कामासाठी काटी,ता. तुळजापुर, जि.उस्मानाबाद येथील आरोपी ग्रामसेवक विजय नारायण चिते यांनी ७,००० रुपये लाचेची मागणी केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे तक्रार दिली असता दिनांक १० /८/ २०२० रोजी सापळा लावून त्यास तेवढ्याच रकमेची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले याबाबत तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही सापळा अधिकारी गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.उस्मानाबाद मार्गदर्शन अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. औरंगाबाद,अनिता जमादार,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि.औरंगाबाद, प्रशांत संपते पो.उप.अधीक्षक, उस्मानाबाद यांनी केली.


Post a Comment

0 Comments