Latest News

6/recent/ticker-posts

घरकुती लाईट बिल वाढ संदर्भात चाकुर तालुका युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन

घरकुती लाईट बिल वाढ संदर्भात चाकुर तालुका युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) सध्या संपूर्ण लॉकडाऊन आहे.कोणत्याही व्यवहार चालु नाहीत.गेली चार महिन्यांपासुन रोजगार उपलब्ध होत नाही. कोरोना सारख्या महाभंयकर विषाणुचा सामना सामान्य नागरिक करीत असताना.ग्रामीण भागातील विज ग्राहकांना घरगुती विज बिल अजावी येत आहे.मागील रिंडिगच्या आधारावर ग्राहकांना विज बिल देण्यात यावे असे आदेश महावितरणला असताना सुध्दा विज ग्राहकांच्या घरी जाऊन रेडिंग न घेताच अंदाजे बिल देऊन चाकुर तालुक्यातील घरगुती विज धारकांची आर्थिक लुट महावितरण करीत आहे.अजब म्हणजे कांही ग्राहक विजबिल भरुन सुध्दा त्यांना वाढीव विज बिल येत आहेत. चाकुर तालुक्यातील विज ग्राहकांची होणारी आर्थिक लुट तात्काळ थांबवावी अशी मागणी चाकुर तालुका युवासेनेने चाकुर तहसिलदार बालाजी चितळे यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली आहे. विज बिला रेडिंग प्रमाणे नाही दिल्यांस युवा सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात आंदोलन करण्यांचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनांवर न.प.सभापती गोपाळ माने,युवा सेना जिल्हाप्रमुख श्रीनिवास नरहारे,युवासेना जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण पेठकर,तालुका प्रमुख रविराज शिरुरे,शहरप्रमुख बबलु कांबळे,नाथा मद्रेवार,वैभव पाटील,विठ्ठल फुलारी,शंकर शेलार, सतीश गायकवाड, राजु शेवाळे,महादेव सुगावकर,कार्तिक येचेवाड,आदिच्या निवेदनांवर स्वाक्षरी आहेत.


Post a Comment

0 Comments