कोरोनायोद्धा(परिचारिका)
हार मानली आज जगाने
नात्यांमध्येही आली दरार
कंबर कसूनी उभी रुग्णासाठी
मृत्यूशी तिने केला करार
धार लागली घामाची अन्
श्र्वास गुदमरला किटमध्ये
दुर्लक्ष करुनी स्वत:कडे
ती व्यस्त रुग्ण सेवेमध्ये
कुटुंब ना दिसले समोर तीला
ना भविष्य दिसले स्वत:चे
रुग्ण तीचा अन् कर्तव्य तीचे
अन् कल्याण या विश्र्वाचे
परिचारिका ही बाधीत नसते
कोरोनाशी ती फक्त लढते
पाहू नये संशयाने समाजाने
पाठ फिरवली नात्यांनीही
आज सेवेशी तीच उरते
दिली आहुती स्वप्राणाची
त्या योद्धयांना आदरांजली
नावाआधी फ्लाॅरेन्स लाऊनी
वाहवी त्यांना श्रद्धांजली
✍️निशा शिंदे(काव्यनिश)
सिपिआर हाॅस्पिटल, कोल्हापूर
0 Comments