रोटरी करिअर फेस्टचे अॉनलाईन आयोजन
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) रोटरी क्लब चाकुरच्या वतीने रोटरी करिअर फेस्टचे आयोजन अॉनलाईन करण्यात आले आहे.यामध्ये आपण सहभाग घेऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यांस मदत होईल.रोटरी क्लब चाकुरच्या मार्गदर्शन अॉनलाईन मध्ये नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करावे असे आहवान रोटरी तर्फे करण्यात आले आहे.
दिनांक ११ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत (रोटरी करिअर फेस्ट)" चे ऑनलाइन आयोजन करण्यात आलेले आहे दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य करिअरची निवड करणे महत्त्वाचे आहे. आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. योग्य माहितीच्या आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते. या गोष्टी लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ चाकूर तर्फे १० वी, १२ वी, पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत (रोटरी करिअर फेस्ट)" चे ऑनलाइन आयोजन करण्यात आलेले आहे . या पाच दिवसीय कार्यक्रमामध्ये विज्ञान, वाणिज्य, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, अश्या विविध क्षेत्राविषयी माहिती मिळणार आहे. या करिअर मार्गदर्शन सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आय. पी. एस. विश्वास नांगरे पाटील, अविनाश धर्माधिकारी,संदीप पाठक,उदय निरगुडकर,प्रा,मोहन देशपांडे,डॉ,धनराज गायकवाड,राजेश बर्गे,राहुल बोधनकर,योगीराज,देवकर,कॕप्टन श्रीकांत वलवाडकर,प्रा.डॉ.शंकर नवले,प्रा.शारंगपाणी कट्टी,सीए आदेश नहार,हे नावाजलेले मान्यवर लाभलेले आहेत. या करिअर मार्गदर्शन सेमिनार मध्ये कोव्हीड १९ नंतरच्या शैक्षणिक संधी,पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संधी,वाणिज्य शाखेच्या विध्यार्थ्यांसाठीच्या संधी,विविध स्पर्धा परीक्षा,सीडीएस परीक्षा, नाट्य आणि कला क्षेत्रातील संधी इत्यादी विषयांवर उहापोह होणार आहे. त्यासाठी https://forms.gle/KyK4qNixFEDTpbR19 लिंकवर नावनोंदणी करावी व संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब चाकूर चे अध्यक्ष रो.विकास संग्रामप्पा हाळे,सचिव रो सुरज शेटे,प्रकल्प प्रमुख रो पांडुरंग पोलावर आणि पब्लिक इमेज अधिकारी रो सागर रेचवाडे यांनी केले आहे.
0 Comments