Latest News

6/recent/ticker-posts

काळजाच्या कप्प्यातून

                         प्रतिक्षा



मी जेव्हा आकाशाकडे टक लावून पाहतो,


ढगांच्या पांढर्‍याशुभ्र ढिगाऱ्यातून 


तू डोकावल्याचा भास होतो.


हात लांबवून तुझ्या कोमल कांतीला स्पर्श करावासा वाटतो


तुझे डोळे जणू काही सांगण्याचा प्रयत्न करतात


माझे तुझ्यावर प्रेम आहे याचा संदेश देऊन जातात


इतक्याच भासाने मन अगदी खुलून जाते


थोडेसे लक्ष विचलित होतं अन...


ढगांच्या आड तु निघून जातेस...


पुन्हा मी वाट पाहतो ढगांच्या स्थिर होण्याची...


ढगांच्या स्थिर होण्याची... 


 


डॉ.अविनाश वेल्हाळ, पुणे


Post a Comment

0 Comments