Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकारांना संरक्षण,शहरात पत्रकार भवन व पत्रकारांसाठी घरकुल देण्याची मागणी

पत्रकारांना संरक्षण,शहरात पत्रकार भवन व पत्रकारांसाठी घरकुल देण्याची मागणी


मराठी समविचारी पत्रकार संघाचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन


चाकुर:(तालुका प्र./सलीमभाई तांबोळी) लातुर,अहमदपूर,उदगीर, निलंगा,औराद शहाजानी या ठिकाणी लाँकडाऊन काळात व्रत्त संकलन करनार्या पत्रकारांना मारहाण करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर कार्यवाही करावी तसेच अहमदपूर तालुक्यातील पत्रकारांना घरकुल व पत्रकार भवन बांधुन देण्यात यावे या मागणीचे उपजिल्हाधिकारी यांना मराठी समविचारी पत्रकार संघाच्या वतिने तालुक्यातील सर पत्रकार बांधवांच्या वतिने निवेदन देण्यात आले निवेदन स्विकारताना नायब तहसिलदार आळंदे मँडम यांची उपस्थिती होती.


      पत्रकारीता करणार्याना कसलीच पगार वा मानधन नसताना केवळ सत्याचा शोध घेत जनसामान्याला न्याय मिळवुन देणे या एकमेव माणसिकतेच्या माध्यमातुन पत्रकार आपल्या लेखनितुन बातम्यांच्या माध्यमातुन जनसामान्यांपर्यंत सत्यता पहोचविण्याचे काम करत असतात पत्रकारिता करत असताना चोवीस तास बातम्या संकलनाच्या कामात व्यस्त असनार्या पत्रकारांना कसल्याच प्रकारचे मानधन वा पगारी नसल्यामुळे स्वतः हाच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणिंचा सामना पत्रकारांना करावा लागतो पत्रकारांना आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणुन केंद्र व राज्यसरकारने पत्रकारांसाठी शहरा जवळील शासकीय जाना उपलब्द्ध करुन देऊन पत्रकारांसाठी घरकुले बांधून द्यावीत व अहमदपूर नगरपालिकेच्या शहरातिल मालकी जागेत पत्रकारांसाठी पत्रकार भवन बनवुन द्यावे असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना सर्वपत्रकार बांधवांच्या वतिने देण्यात आले यावेळी मराठी समविचारी पत्रकार संघाचे मार्गदर्शन उदयकुमार जोशी, संस्थापक अध्यक्ष सलिम सय्यद,सचिव प्रा.रत्नकार नळेगावकर, विद्यमान तालुका अध्यक्ष बासिदखान पठाण सचिव नरसिंह सांगविकर, उपाध्यक्ष प्रा.सचिन कोंडलवाडे, सहसचिव प्रा सादिक शेख, प्रा.बाबन अत्तार, मेघराज गायकवाड, रामलिंग तत्तापुरे, गोविंद गिरी, गोविंद काळे, गणेश हामणे, फेरोज शेख, संजय माकेगावकर, विनोद वट्टमवार, हनुमंत जोगदंड,उदय गुंडीले, नासेर सय्यद,देवनाळे सर, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, शेख मासूम, शिवाजीराव गायकवाड,गणेश मदणे, असलम शेख, राजमुहम्मद शेख, साबेर शेख आदी पत्रकारांची सहमती व निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.


लाँकडाऊन काळातील महत्वपुर्ण बातम्या संकलन करून लोकांपर्यंत पहोचविणे ही जबाबदारी कोराणा महामारित जिव धोक्यात टाकूण करणार्या पत्रकारांना पोलीस प्रशासनाने मागील बातम्यांचा मनात राग धरुन लातुर,अहमदपूर, उदगीर, निलंगा, औराद शहाजानी या ठिकाणी पत्रकारांना मारहाण केली त्या पोलिस अधिकारी व कर्मचारी याच्यावर पत्रकारांना मारहान केल्यावरुन कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी सौ.अश्विनी शेलार मँडम यांना देण्यात आले असुन कार्यवाहीची मागणी समस्थ पत्रकार बांधवांच्या वतिने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments