Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा परीषद लातुरचा गंदगी मुक्त भारत अभियानाचा गंगापुर येथे शुभारंभ

जिल्हा परीषद लातुरचा गंदगी मुक्त भारत अभियानाचा गंगापुर येथे शुभारंभ



गंगापुर ग्रामपंचायत विविध कामाचा शुभारंभ


लातूर:(प्रतिनिधी) गंगापुर येथे आज लातुर जिल्हा परीषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते गंदगी मुक्त अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन. या अंतर्गत सामुदायिक शौचालय शुभारंभ करण्यात आले व नवीन सार्वजनिक सामुदायिक शौचालय बांधकामाचा ही शुभारंभ करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केन्द्राची पाहणी ही करण्यात आली, कोविड संदर्भात अनेक सुचना प्रशासनास देण्यात आल्या. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केन्द्रात वृक्षारोपण मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.


गंगापुर ग्रामपंचायतीचा एक रक्कमी १०० टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभर मोफत दळण देण्याचा, दररोज २० लिटर पाण्याचा १ झार व मिरची कांडप द्वारा मिरची वाटुन देण्याचा निर्णय गंगापुर ग्रामपंचायतीने घेतला आहे.


या उपक्रमाचा ही शुभारंभ करण्यात आला. लातुर जिल्हा परीषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. 


याप्रसंगी सरपंच बाबु खंदाडे, श्याम गोडभरले गटविकास अधिकारी, पंचायत समिती लातुर, उपसरपंच रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मिंड, ईश्वर शेलार, ग्रामविकास अधिकारी परचंडराव, गोरोबा फुटाणे आदि जण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments