सोलापुरात योग प्रशिक्षकांच्या परीक्षा
सोलापूर:(प्रतिनिधी) आयुष मंत्रालय अंतर्गत होणाऱ्या योग परीक्षाचे आयोजन यावर्षी प्रथमच सोलापूर केंद्रावर केले जाणार आहे. यासाठी येथील सोलापूर योग असोसिएशनने परीक्षेची तयारी नियोजन व विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे येथील आयुष मंत्रालयांतर्गत जागतिक योग दिन निश्चित झाल्यानंतर योग जगभरातील सर्व देशात शिकविला जातो त्यामुळे योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. शैक्षणिक संस्था कंपन्या कार्यालये या ठिकाणी योग शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. योग शिक्षकांचा दर्जा ठरविण्यासाठी व उच्च ठेवण्यासाठी प्रमाणिकरणाची गरज भासू लागली आहे. त्यासाठी योग सर्टिफिकेशन बोर्डाची स्थापन करण्यात आली. या योग परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या योगपटूंची योगप्रशिक्षक पदी नियुक्ती केली जाते. या परीक्षेचा दर्जा अतिशय उच्च ठेवण्यात आला आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. यात थेअरी व प्रॅक्टिकल असे दोन पेपर असतात. प्रत्येक परीक्षेत किमान ७० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक असते या परीक्षेत तीन स्तर आहेत. स्तर एकमध्ये योगा प्रोटोकॉल इंस्ट्रक्टरसाठी किमान दहावी उत्तीर्ण व्यक्तीला परीक्षा देता येते तर स्तर दोन मध्ये योगा वेलनेस इंस्ट्रक्टर परीक्षासाठी बारावी उत्तीर्ण व्यक्तीला परीक्षा देता येते तर स्तर तीनमध्ये योगाटीचर अँड इव्हॅल्यूर्टर परीक्षा पदवीधराला देता येते इच्छुकांनी सोलापूर योगा असोसिएशन चे अध्यक्ष मोहनजी भुतडा ९८२२०६०७६५ / ८०८७४२१०२५ /९०२८२२२४१५ / ७३५०१८७००७ लातूर जिल्ह्यातील इच्छुक परीक्षार्थीनी रुलर अँड अर्बन योगा असोसिएशन,लातूरचे अध्यक्ष के.वाय.पटवेकर ९२७०८८८५८७ या भ्रमणध्वनी वरती संपर्क करण्याचे अहवान केले आहे.
0 Comments