Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना रुग्णांसाठी यशस्वी प्रयोग; संगीतमय एरोबिक्स प्रशिक्षण लक्ष वेधून घेत आहे

कोरोना रुग्णांसाठी यशस्वी प्रयोग; संगीतमय एरोबिक्स प्रशिक्षण लक्ष वेधून घेत आहे



लातूरच्या कोविड केअर सेंटर मधून कोरोनावर मात करणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या उल्लेखनीय असून यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अनेक कोविड योध्यांची प्रत्यक्ष मेहनत, जिद्द, सेवा, जिल्हा प्रशासनाची भूमिका, मा. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला कोविड रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण आणि यशस्वी प्रयोग संगीतमय एरोबिक्स प्रशिक्षण देशाचे लक्ष वेधून घेत आहे.


समाजात कोविड रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन, या रोगाविषयी असलेली प्रचंड भीती आणि चुकीचे समज यामुळे रुग्णांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक खच्चीकरण होत आहे. अशा रुग्णांना मानसिक आधार देत, त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी एरोबिक्स प्रशिक्षक दीपक लोखंडे प्रत्यक्ष रुग्णांसोबत दररोज अविरतपणे प्रशिक्षण देत आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच देशभरातील अनेक ठिकाणी याचे अनुकरण होताना दिसत आहे. रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी केलेला हा प्रयत्न यशस्वी होत असून कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात दीपक लोखंडे यशस्वी ठरले आहेत. लोखंडे यांच्यासारख्या खऱ्या कोविड योध्यांचे कार्य कौतुकास्पद, प्रशंसनीय आणि अनुकरणीय असेच आहे.


कोविडच्या या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा मनस्वी अभिमान वाटत असल्याचे मत प्रशिक्षक दीपक लोखंडे यांनी व्यक्त केले आहे. या प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून हा अनोखा लातूर पॅटर्न कोविड युद्धात दिशादर्शक आणि आशादायक आहे यात शंका नाही.


 


सतीश व्ही.तांदळे, मुक्त पत्रकार


Post a Comment

0 Comments