मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा
कोरोनाच्या महामारीमध्ये चक्क आरोग्य अधिकारी,कर्मचारी अन्य विभागातील प्रमूख अधिकारी, कर्मचारी यांचे अप डाऊन करणे नाही थांबल्या मनसे स्टाईल आंदोलन करु- डॉ. नरसिंह भिकाणे,निरंजन रेड्डी
चाकुर: (ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.देशासह जगात कोरोनाने अहंकार माजविला आहे.चाकूर शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.त्यांच्यावर उपचार करण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी कर्मचारी मुख्यालयी न राहता अप-डाऊन करत आहेत.खास म्हणजे आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी यांचा समावेश आहे.तसेच अन्य विभागातील हीच परिस्थिती आहे.गावपातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक कोणीही मुख्यालयी राहात नाही.त्यामुळे चाकूर तालुक्याचे एकंदरीत विकासात्मक वाताहात होत आहे.
लातूर जिल्ह्यात कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे.त्या अनुषंगाने चाकूर तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व दंडाधिकारी म्हणून आपण सर्व विभागप्रमूखाना २८ एप्रिल २०२० रोजी एक आदेश काढून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आढावा मागवला होता.तसेच त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले होते. मागविलेला आढावा अध्याप कोणी दिला नाही. तुमच्या आदेशाला हे जुमानत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे कितपत वेळेवर होत असतील. यावरुन स्पष्टपणे जाणवते.मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५६ नुसार तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदी नुसार कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही चा अहवाल ही सादर करण्यास सांगितले होते.कारण सद्या : स्थितीत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारी वर युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे जनतेची कामे विकासात्मक कामे रेंगाळत आहेत.अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत आहेत.बाहेरून ये जा करत आहेत.तसेच गावपातळीवरील कार्यरत ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,आरोग्य सेवक,तलाठी,कृषिसहायक आदीं साहित तालुकास्तरावरील पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,सहायक निबंधक,कृषी कार्यालय,ग्रामीण रुग्णालय,शिक्षणाधिकारी कार्यालय,नगरपंचायत कार्यालय,भूमिअभिलेख आदी कार्यालयातील बहूतांशअधिकारी,कर्मचारी अप डाऊन करतात.हे मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत आहेत. जे अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.आणि घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करतात.हे अधिकारी कर्मचारी जनतेची दिशाभूल करत आहेत.मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे विरुध्द त्यांनी शासनाची फसवणूक केली.अशा अधिकारी,कर्मचार्याविरुध्द त्यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करावेत.यापुढे सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत.विषेश करून आरोग्य विभागाला खास निरोप द्यावा.तरी आपण अद्यापि कोणावरही निलंबनाची कार्यवाही का केली नाही?आपणाला विविध कार्यालयांच्या आधिकाऱ्यानकडून अहवाल प्राप्त झाला नाही काय? या महामारीतही जर अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील व आपणही त्यांच्यावर कार्यवाही करणार नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे अधिकारी जा ये करत आहेत.त्यांच्या कार्यालयाला ताळे ठोकले याची नोंद घ्यावी.
मुख्यालयी रहा अन्यथा ठाळे ठोकु मनसे स्टाईल आंदोलन करु येणाऱ्या कांही दिवसांमध्ये जर अधिकार व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे चालु नाही केले तर म.न.से.कडुन त्या कार्यालयाला ताळे ठोकण्यात येऊन ही बाब प्रशासनासमोर आणली जाईल असा इशारा हि पञकार परिषदेत दिला. यावेळी डॉ.नरसिंह भिकाणे, जिल्हाध्यक्ष मनसे लातर निरंजन रेड्डी,तालुकाध्यक्ष चाकूर सुरेश शेवाळे(कृषितालुकाध्यक्ष चाकूर,यश भिकाने,तुळशिदास माने,कोळेकर सत्यनारायण,शुभम होनराव,विठ्ठल पवार,कृष्णा गीरी,मारोती पाटील,आविनाश झांबरे,विठ्ठलप्रसाद झांबरे,आदि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments