कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हयात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी
लातूर:(प्रतिनिधी) दि.९- जिल्हयात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी कोरोना (कोव्हीड-१९) संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनेचा एक भाग म्हणून दुचाकी वाहनावर एका व्यक्तीपेक्षा जास्त, ऑटो रिक्षात (१+२) पेक्षा जास्त , कारमध्ये (१+२) पेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीविरुध्द पुढील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये घरातील महिला / आई / वडील/ मुलगा/ मुलगी ई. यांचेसमवेत दुचाकी वाहनावर प्रवास करण्याची सुट देण्यात येत असून अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. कोव्हीड-१९ प्रतिबंधासाठी आवश्यक वैयक्तिक शिस्त भंगाचा प्रकार, दंडात्मक कारवाई , कारवाई करणारा विभाग पुढील प्रमाणे आहे. सार्वजनिक ठिकाणी चेऱ्यावर मास्कचा वापर न केल्यास रु. ५००/- दंड कारवाई करणारा विभाग -स्थानिक स्वराज्य, (म.न.पा./न.पा./न.पं./ग्रा.पं.) / पोलीस /महसूल विभाग, संबंधित विभागाने शिस्तभंग करणाऱ्या व्यक्तीवर निशुल्क मास्क पुरवून घालावयास सांगून सदर कार्यवाही समक्ष पूर्ण करुन घेण्याची दक्षता घ्यावी. दुचाकी वाहनावर एका व्यक्तीपेक्षा जास्त आढळल्यास रु. ५००/- दंड व दुचाकी वाहनावर दोन व्यक्तीपेक्षा जास्त आढळल्यास रु. ७५०/- दंड कारवाई करणारा विभाग स्थानिक स्वराज्य, (म.न.पा./न.पा./न.पं./ग्रा.पं.) / पोलीस /महसूल विभाग,राहील.प्रवासी तीनचाकी ऑटो रिक्षात (१+२) तीनपेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास रु. ५००/- दंड कारवाई करणारा विभाग स्थानिक स्वराज्य, (म.न.पा./न.पा./न.पं./ग्रा.पं.) / पोलीस /महसूल विभाग, राहील. तसेच प्रवासी चारचाकी कार मध्ये (१+२) तीन पेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास रु.१०००/-दंड कारवाई करणारा विभाग स्थानिक स्वराज्य, (म.न.पा./न.पा./न.पं./ग्रा.पं.) / पोलीस /महसूल विभाग,कारवाई करतील. असे ही आदेशात नमुद केले आहे.
0 Comments