चापोली:(प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील चापोली येथे डॉक्टर्स डे हा कृषी दिनाचे औचित्य साधून ' एक डॉक्टर एक वृक्ष ' भेट देऊन साजरा करण्यात आला. येथील युवक रमेश पाटील यांनी कोरोना विषाणुच्या जागतिक महामारीत अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या योद्धयांच्या प्रती कृत्यज्ञतापर डॉक्टर डे निमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून 'एक डॉक्टर एक वृक्ष 'या संकल्पनेतून येथील शासकीय व खाजगी डॉक्टरांना फिजीकल डिस्टन्सिंग पाळून वृक्ष भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी डॉ.पुंडलिक चाटे,डॉ.राजाराम कुलकर्णी,डॉ.विनायक लामदाडे, डॉ.नरेंद्र हाक्के, डॉ.जियाउल हक्क देशमुख,आरोग्य सहाय्यक विकास ठोंबरे,यांना वृक्ष भेट देऊन आरोग्य उपकेंद्र परीसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी भारतीय माजी सैनिक संघटना चाकूर तालुकाध्यक्ष गजेंद्र स्वामी,तंटामूक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव,माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव,लहू चाटे,अँड.संग्राम पाटील, संदीप आबंदे,आरोग्य परीचारीका ए.पी.भंडारे, आशा स्वयंसेवीका अनिता होनराव,प्रज्ञा शिंदे,मनीषा स्वामी,माया सरकाळे,ज्योती आबंदे,सविता उळागड्डे,सोनाली लामतूरे आदीजन उपस्थित होते.
0 Comments