Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ता.देवणी जि. लातूर यांच्या वतीने आज दिनांक:-१०/७/२०२० रोजी देवणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी काही अज्ञात समाज कंठकांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध तसेच मागील काही महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात दलित व बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारात विक्रमी वाढ झालेली आहे,महाराष्ट्रात दलित समाजवर होत असलेले अन्याय-अत्याचार तात्काळ रोखन्यात यावे अशा विविध सामाजिक मागण्या करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)ता.देवणी यांच्या वतीने तहसीलदार तहसील कार्यालय देवणी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन राजगृहारील हल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला,यावेळी तालुका अध्यक्ष विलास वाघमारे,युवा तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,ग्रामीण तालुका अध्यक्ष रोहित डोंगरे,तालुका सचिव गोविंद हणमंते,शिवाजी माने,पप्पू बनसोडे,नजीर बौडीवाले,चाँदपाशा बौडीवाले,गुणवंत कांबळे,महेपती कांबळे,काशीनाथ बनसोडे,सुरेखा विलास वाघमारे,सागरबाई बनसोडे,सुनिता बनसोडे,नंदाबाई सोनवणे,अष्टशिला बनसोडे,खाजाबी शेख,जमीना बौडीवाले,आरती मादळे,फातीमा सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments