पालकमंत्र्यांच्या शिफारशीने ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणजे गावा गावात भांडणे लावण्याचा प्रकार- आ संभाजीराव पाटील निंलगेकर
लातूर:(प्रतिनिधी) राज्यात मुदत संपलेल्या ग्राम पंचायतवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने गावातीलच व्यक्तीची नियुक्ती हा लोकशाहीला घातक पायंडा असून यामुळे गावांगावात भांडण लावण्यासारखा प्रकार असल्याची टीका माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
राज्य शासनाने काही दिवसापूर्वी एक परिपत्रक काढले आहे. मुदत संपलेल्या ग्राम पंचायतवर प्रशासक म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीवर गावातील एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे चुकीचे असून सध्याच्या विद्यमान सरपंनाच कायम ठेवण्यात यावे, असे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले आहे. सदर निवेदनावर विचार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी लागलीच कळवले.
कोरोनाच्या महाभंयकर काळात ग्रामीण भागातील गावामध्ये भांडणे लावणारा हा निर्णय असून गावात एकोपा ठेवायचा झाला तर लोकशाहीला घातक निर्णय तात्काळ रद्द करावा, केंद्र शासनाने दुरूस्त केलेल्या ७३ व्या ग्रामीण भागाच्या संकल्पनेला व अस्तित्वाला सुध्दा धोका करणारा हा आदेश आहे. सध्या अस्तित्वात असलेले सरपंच कायम ठेवून लोकशाहीला गदा आणणारा हा निर्णय तात्काळ रद्द करावा व ग्रामीण भागात भांडण तंटे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
0 Comments