Latest News

6/recent/ticker-posts

शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ गुरुद्वारात अरदास व 'श्री अखंडपाठ साहेब " संपन्न

शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ गुरुद्वारात अरदास व 'श्री अखंडपाठ साहेब " संपन्न


शहीद गुरतेजसिंघ यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपुर्द 


अकरा लाखांची मदत 


नांदेड:(प्रतिनिधी) दि. २ - भारतीय सीमेवर चीन देशाच्या सैन्य घुसखोरीला प्रतिउत्तर देतांना हुतात्म्य पत्करणाऱ्या शहीद गुरतेजसिंघ आणि सर्व हुतात्मा भारतीय सैनिकांच्या आत्मशांतिसाठी गुरुवार, दि. २ जुलै श्री गुरुग्रंथ साहेबाच्या अखंडपाठची समाप्ति व अरदास करण्यात आली. 


या वेळी हैडग्रंथी भाई कश्मीरसिंघ जी यांनी पाठचे पठन केले तसेच पंजप्यारे भाई रामसिंघजी यांनी आत्मशांतिसाठी अरदास (प्रार्थना ) केली. या वेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविन्दरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागिया, कनिष्ठ अधीक्षक ठानसिंघ बुंगाई, नारायणसिंघ नंबरदार, हरजीतसिंघ कडेवाले, रविंदरसिंघ कपूर आणि इतर नागरिकांची उपस्थिती होती. गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी वरील विषयी माहिती दिली की, दि. १५ जून रोजी भारतीय सीमेवर भारतीय सैनिक आणि घूसखोर चीनी सैनिकांमध्ये मोठा सैन्य संघर्ष घडून आला आणि वीस भारतीय सैनिक हौतात्म्य झाले. यात बारा चीनी सैनिकांना यमसदनी पाठवून हुतात्म्य पत्करणाऱ्या युवा वीर सैनिक गुरतेजसिंघ पिता विरसासिंघ याचाही समावेश होता. शीख धर्माच्या शौर्य आणि बलिदानाच्या पर्वात गुरतेजसिंघ याने देखील मोठे योगदान दिले. वरील घटनेची नोंद घेत गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास, उपाध्यक्ष स. गुरिंदरसिंघ बावा, सचिव स. रविंदरसिंघ बुंगई, गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्यगण यांनी हौतात्म्य सैनिकांसाठी अखंडपाठ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि दि. ३० जून रोजी गुरुद्वारात पाठ सुरु करण्यात आले. या पाठाचे समापन गुरुवार दि. २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्रद्धापूर्वक झाले.


गुरतेजसिंघच्या घरी पोहचून केली आर्थिक मदत प्रदान



पंजाब येथे आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करतांना बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगई, समन्वयक परमज्योतसिंघ चाहल आणि इतर.


गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविंदरसिंघ बुंगई आणि बोर्डाचे समन्वयक सदस्य स. परमज्योतसिंघ चाहल यांनी गुरुवार, दि. २ जुलै २० रोजी शहीद सैनिक गुरतेजसिंघ यांच्या घरी पोहचून अकरा लाख रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुम्बियांच्या सुपुर्द केला. त्यांच्या सोबत शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचे सदस्य जत्थेदार जगमीरसिंघ मागेआना, धर्मप्रचार कमेटी तलवंडी भठिंडा कार्यालयाचे प्रमुख भाई भोलासिंघ हीरेवाला, तखत दमदमा साहेब कार्यालयचे अधीक्षक भाई परमजीतसिंघ होते. गुरतेजसिंघ हा पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील बुधलाडा तालुक्यातील बिरावाला डोगरा या लहान गावातील रहिवाशी होता. बोर्डाकडूनगुरतेजसिंघ यांच्या आजी माता गुरदीप कौर, वडील विरसासिंघ, आई प्रकाशकौर, भाऊ त्रिलोकसिंघ, गुरप्रीतसिंघ, भावजइ लवप्रीतकौर यांनी धनादेश स्वीकारला.


Post a Comment

0 Comments