Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना विजबिलाचा शॉक; म.न.से कडून विजबिलाची होळी


शेतकऱ्यांना विजबिलाचा शॉक; म.न.से कडून विजबिलाची होळी


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चापोली येथे मनसेकडुन विजबिलांची होळी करण्यात आली. गेली अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांना विकता न आल्यामुळे शेतामध्ये सडला.वाहतूक बंद असल्यामुळे बाजारपेठेत नेता आला नाही व जेव्हा नेला तेव्हा व्यापाऱ्यांनी बेभाव घेतला त्यातच सोयाबीन च्या बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट आले यामध्ये शेतकरी आर्थिक दृष्टया पूर्णतः कोलमडला.आणि आता दुष्काळात तेरावा महिना म्हणल्यासारखे महावितरण ने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाईट बिल आकारल्यामुळे त्याचे कंमबरडे पूर्णतः मोडले आहे याचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली चापोली येथे वीज बिलाची होळी करत निषेध व्यक्त केला.अनेक शेतकऱ्यांना शेकडो मध्ये येणारी विजबिले ही कित्येक पटीने वाढून हजारो मध्ये आली आहेत व राज्यशासनाच्या च्या उर्जामंत्र्यांनी अतिशय तोकडी 'एकदाच वीज बिल भरले तर दोन टक्के माफ' असे हस्यास्पद शासनाचे औदार्य जनतेसाठी दाखवले आहे. अशी तुटपुंजी वीजबिल माफी न करता शासनाने शेतकऱ्यांचे गेल्या तीन महिन्याचे वीज बिल पूर्णतः माफ करावे तरच या सुलतानी संकटातून शेतकरी वाचेल अन्यथा येत्या काही दिवसात अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकर्यांच्या आत्महत्या दिसून येतील.माणसेही येत्या काळात आंदोलन तीव्र करेल याची नोंद घ्यावी. या आंदोलनला तालुकाअध्यक्ष निरंजन रेड्डी, कृषी तालुकाअध्यक्ष सुरेश शेवाळे,तुळशीदास माने,म.न.वी.से प्रसिद्धीप्रमुख यश भिकाणे,सत्यनारायण कोळेकर,भागवत शंकरे, चंद्रकांत मलीशे,मारोती पाटील,विठ्ठल पवार,बबलु शेवाळे,शंकर पाटील आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments