नांदेड:(प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त आणि नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल वाघी तालुका नांदेड येथे आज इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्या, मास्क, पेनचे वाटप करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, बबनरावजी वाघमारे,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे, सरपंच प्रतिनिधी पंडितराव जानकर, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी साहेबराव धनगे यांनी वाघी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. या कोरोना विषाणूमुळे शिक्षणाचे फार मोठे नुकसान होत आहे हे कधीही भरून निघणार नाही, अशी खंत व्यक्त केली. मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशाहा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन प्रलोभ माधवराव कुलकर्णी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी माने व हेमंत वागरे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments