पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची आडवणुक कराल तर गाठ आहे माझ्याशी - खा.ओमराजे निंबाळकर
निलंगा:(प्रतीनीधी) दि. ३ राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज द्यावे. त्यांना दिलेल्या मर्यादे प्रमाणे पीककर्ज वाटप होत नसेल, तर गाठ माझ्याशी आहे. अशा सक्त सुचना उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर याचेकडुन करण्यात आल्या. खा.ओमराजे हे उस्मानाबाद मतदार संघातील कोरोनाबाधीत गावांचा दौरा काढुन आढावा घेत घेऊन अधिकारी यांना कांही उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या तसेच ते औसा तालुक्यातील पिक कर्ज वाटपासंदर्भातील बैठकीला जाण्याअगोदर पंचायत समिती निलंगा येथेही कांही बँकाकडुन शेतकऱ्यांना पिककर्जासाठी आडवणुक होत आसल्याच्या तक्रारी पाहुन तेथेच बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या पिककर्ज वाटपासाठी च्या कामात कसूर करणाऱ्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बँकाना दिला. निलंगा पंचायत समिती येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज निलंगा तालुक्यातील १६८ गावातील शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज वाटप करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. फालतू कागदपत्र शेतकऱ्यांना मागून त्यांचा अपमान करू नका. शक्य तेवढे लवकर आणि सुलभ पीककर्ज द्या. त्यांच्या हक्काची बँक आहे दत्तक गाव आणी दत्तक बँक या बिनबुडाचे कारण पुढे करुन शेतकऱ्यांना पिककर्जापासुन आडवणुक करु नका यामुळेच शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर बँकांनी पीककर्ज वाटप केलेच पाहिजे. अनेक बँका तुमचे गाव आमच्या बँकेला दत्तक नाही, म्हणून वापस पाठवतात. दत्तक बँक कोणत्याही घटनेत तरतूद नाही. बँक क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाचा लाभ घेता येतो. कर्ज मागणी करायला आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या, बे बाकी प्रमाणपत्र आता मागू नका, ते ऑनलाईन झाले आहे, अशाही सूचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी उपस्थित बँक व्यवस्थापकांना केल्या. यावेळी औराद शहा. येथिल शेतकरी अमोल ढोरसिंगे यांनी इ.स.२०१४ मध्ये चाळीस हजार रुपये चे पिककर्ज घेतलेले होते आणी देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली होती व त्या यादीत त्यांचे नावही होते पण त्यांना कर्जमाफी अद्यापही मिळालेली नाही व त्यांनी सहाय्यक निबंधक निलंगा यांनाही कर्जमाफी मिळाली नसल्याची तक्रार केली पण अद्यापही त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही असे कागदपत्रे दाखवुन सांगितले. तर ननंद येथील उपस्थित शेतकरी अण्णासाहेब मिरगाळे यांनी कोणत्याही बँका शेतीवर व्यापार करण्यासाठी कर्ज देत नाहीत अशी तक्रार खासदाराला केली. या बैठकीत अनेक गावातील शेतकरी व नागरीक उपस्थित होते. त्यांनी तक्रारी बोलून दाखवल्या. कर्जासाठी कोणतीही बँक आम्हाला दारात उभे ठाकू देत नाहीत असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, चेअरमन दगडू सोळुंके, माजी सभापती अजित माने, सुरेश बिरादार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते उपस्थित होते.
0 Comments