Latest News

6/recent/ticker-posts

राज्यातील ग्राम पंचायत वर पोलिस पाटील यांना प्रशासक म्हणून संधी उपलब्ध करून द्यावी - मुक्ताराम पिटले  (पोलीस पाटील)


 


निवेदनाद्वारे "पोलिस पाटील संघटना,लातूर " मागणी करणार


लातूर:(प्रतिनिधी) राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. तसेच राजकीय लोकांना ही संघी पुन्हा मिळणार असून पोलिस पाटील सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास प्रशासकीय अनुभव पात्र व्यक्ती आहे. ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांना गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते तसेच त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामीण भागातील पोलिस पाटील उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पोलिस पाटील प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी "पोलिस पाटील संघटना लातूर " च्या वतीने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंञी यांना करण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून त्या-त्या गावातील (भागातील) ग्रामीण पोलिस पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी "पोलिस पाटील संघटना यांच्या " कडून करत आहोत असे मुक्ताराम पिटले (पोलीस पाटील) बाभळगाव ता.जि.लातूर सचिव: पोलीस पाटील संघटना लातूर जिल्हा यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.


Post a Comment

0 Comments