देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) वंचित बहुजन आघाडीचे देवणी तहसीलदारांना निवेदन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई स्थित राजग्रहावर काही समाजकंटक जातीयवादी लोकांनी तोडफोड करून विद्रूप करण्याचे कट कारस्थान केले यावरुन सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सरकारने आश्या समाजकंटक आणी विक्रुती स्वरूपाच्या लोकांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी आणी हे षडयंत्र कुणाचे आहे याचा तपास करून कठोर ते कठोर शिक्षा द्यावी आणी कायमस्वरूपी राजगृहाला सुरक्षा प्रदान करावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी देवणी तालुका अध्यक्ष व्यंकट सुर्यवंशी,शहर अध्यक्ष भैयासाहेब देवणीकर,धनराज बनसोडे ग्रामपंचायत सदस्य वलांडी. शाखा अध्यक्ष वलांडी रविंद्र बनसोडे,युवा अध्यक्ष गौतम गायकवाड, वैभव म्हेत्रे सुनिल गजबार व वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments