लाईट बिल माफ करा अन्यथा महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी उस्मानाबाद ला घेराव घालणार- एम आय एम शहराध्यक्ष,अजहर सय्यद
उस्मानाबाद:(प्रतिनिधी) मागील तीन-चार महिन्यांपासून संपूर्ण भारत देशात covid-19 संसर्गजन्य रोगामुळे लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे सदर काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसलेही मजुरीचे काम व इतर व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे आर्थिक अडचणीच्या सामोर जावे लागले आहे त्यामुळे सदरील काळातील महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व घरगुती व व्यावसायिक विज बिल माफ करणे अत्यंत गरजेचे आहे कारण उस्मानाबाद जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो व सदरील covid-19 या रोगामुळे उस्मानाबाद जिल्हा हा आणखीन आर्थिक स्थितीवर पिच्छाडला गेला आहे त्यामुळे जिल्ह्यात सदरील काळात लोकांना स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे हे अत्यंत कठीण झाले आहे सदरील काळात जनता त्रस्त झालेली आहे covid-19 या संसर्गजन्य रोगामुळे तरी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील लाईट बिल माफ करावे असे निवेदन आज उस्मानाबाद एमआयएम पक्षातर्फे देण्यात आले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य नितीन राऊत यांनी लाईट बिल माफ करावे उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली उस्मानाबाद एम आय एम पक्ष हा महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी उस्मानाबाद च्या ऑफिसला घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम शहराध्यक्ष अज़हर सय्यद,जिला प्रवक्ता शहबाज काझी,माजी तालुकाध्यक्ष ज़मिर खान,माजी युवा शहर अध्यक्ष सद्दाम मुजावर,आणि सरफराज शेख, यांच्याकडून इशारा देण्यात आला.
0 Comments