लातूर:(प्रतिनिधी) बोगस बियाणे प्रकरणी महाराष्ट्रभरातून ५३९२९ तक्रारी दाखल झाल्या आहेत परंतु कृषी विभाग व बियाणे कंपनी यांचे साटेलोटे असल्यामुळे राज्यात कृषी विभागाकडून फक्त ५० ते ५५ ठिकाणीच गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे दोषी महाबीजसहित सर्वच कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच ज्यांच्या मुळे हे बोगस बियाणे बाजारात आले असा गुणनियंत्रक विभाग,बीज प्रमानिकीकारण विभाग,कृषी विभाग या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन तुटपुंजी रक्कम देऊन,तोंडाला पाने न पुसता हेक्टरी २५००० रु ची मदत देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरगुती बियाणे पेरले आहे अशा ही शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संतोष नागरगोजे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात कृषी सहसंचालक कार्यालय लातूर येथे तोडफोड आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी,रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुंडे,तालुका सचिव भागवत कांदे आदी
0 Comments