Latest News

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात कोवीड-१९ डेलीगेटेड रूग्णालयाची उभारणी

जिल्ह्यात कोवीड-१९ डेलीगेटेड रूग्णालयाची उभारणी


विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल २०० बेडचे                                               लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्था परीसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अदययावत अशा सर्व सुवीधायुक्त २०० बेडच्या कोवीड-१९ डेलीगेटेड रूग्णालयाची निर्मीर्ती करण्यात आली असून सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी अमित विलासराव देशमुख (वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर ) यांनी भेट देऊन पाहणी केली. वैदयकीय महाविदयालयाच्या परीसरातील सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल रूग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे. सदयाची कोवीड-१९ प्रादुर्भावाची परिस्थीती लक्षात घेता व वाढत्या रूग्णावर तातडीने उपचार करता यावेत ही बाब लक्षात घेऊन या ठीकाणी २०० बेडचे कोवीड-१९ डेलीगेटेड रूग्णालय उभारण्यात आले आहे. येथील सर्व बेडना ऑक्सिजन पुरवठयाची सुवीधा असून ६० वेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. या ठीकाणी स्वतंत्र नोंदणी विभाग तसेच अदयावत अशी क्षकीरण, सोनोग्राफी यंत्रणा बसविण्यात आली आहे. येथे स्वतंत्र डायालीसीसची व्यवस्था आहे.या कोवीड-१९ डेलीगेटेड रूग्णालयास भेट दिल्या नंतर तेथे उभारलेल्या एकुण सोयीसुवीधा बददल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, डॉ.अनिल मुंडे, डॉ. महादेव बनसोडे, डॉ.उमेश लाड, डॉ.मंगेश सेलुकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.बी.सोनटक्के, व्ही.वाय. आवाळे,वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक बी.वाय. गड्डीया, सहाय्यक अभियंता व्ही.मोहन कृष्णा, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments