Latest News

6/recent/ticker-posts

जिपच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगाना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान वाटप

जिपच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगाना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान वाटप


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी)  लातूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत १० दिव्यांगांना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्य़ातील ६२ आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याना प्रत्येकी ५० हजार रूपयाचा धनादेश माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, खा. सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते सोमवारी वाटप करण्यात आले. यावेळी जिपच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस एल खमीदकर आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments