लातूर २२० पैकी १५९ निगेटिव्ह ४० पॉझिटिव्ह २० Inconclusive व १ रद्द
लातूर-२१, उदगीर- ३, अहमदपूर ५, निलंगा-२, औसा-८, कास.शिर्शी-१ रुग्ण पॉझिटिव्ह
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ४९ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ११ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ६ व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण ८४ कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी २७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज ५ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.
0 Comments