लातूर-२९, उदगीर-११, अहमदपूर-५, निलंगा-६, औसा-२ कोरोना पॉझिटिव्ह
आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून १२, एमआयडीसी येथील कोविड केअर सेंटर मधून १ व औसा येथून ५ असे जिल्ह्यात एकूण १८ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाली असल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ८४ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून १४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व १२ व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत व ५ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. दिनांक ८.७.२०२० रोजी ६ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ३ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २७२, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३२२ व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २८ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१२
0 Comments