क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचे दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
१०० टक्के निकाल, यशाची परंपरा कायम
अहमदपूर:(प्रतिनिधी) मार्च-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई दहावी परीक्षेत क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल व जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
विद्यालयातून विरेन्द्र चन्द्रशेखर सावरगावे (९१ टक्के )प्रथम, आर्या आशिष गुणाले ,पार्थ अतुल कोटगिरे व साक्षी संतोष देशमुख (८९ टक्के ) द्वितीय, तर अथर्व सचिन चालिकवार, गितेश नागोराव चिट्टे, महेविश नफिस पठाण व पार्थ मोहन नटवे (८८ टक्के ) गुण घेऊन तृतीय आलेले आहेत.
या यशाबद्धल संस्था अध्यक्ष जीवनकुमारजी मद्देवाड, प्रशासक रितू जीवनकुमार मद्देवाड, प्राचार्य राजेश यादव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम राखली असून याही वर्षी शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातील ६१ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती.
एकूण परीक्षार्थी विद्यार्थी - ६१
मेरिटमध्ये - ०४ विद्यार्थी उत्तीर्ण,
विशेष प्राविण्याने - ३४ विद्यार्थी,
प्रथम श्रेणीमध्ये - १७ विद्यार्थी,
द्वितीय श्रेणीत - ०६ विद्यार्थी
उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी चांगले गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेचे अकॅडमिक समन्वयक महेंद्र पांडे, स्कूल समन्वयक संगमेश्वर ढगे, पर्यवेक्षिका सुधाराणी केशव यांनी वर्षभर मार्गदर्शन केले होते.
0 Comments