चिंता वाढली: आज पुन्हा जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर २३६ पैकी १९२ निगेटिव्ह १६ पॉझिटिव्ह ११ Inconclusive २५ प्रलंबित व २ रद्द
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ७३ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उर्वरीत १७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून २ व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. दिनांक ३.७.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील ८ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी ४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण ५६ कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज ५ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली. आज मा. जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी विलासराव देशमुख वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असलेल्या विलगीकरण कक्षास व अतिदक्षता विभागास भेट देऊन पी. पी. ई. कीट घालून पाहणी केली व आवश्यक त्या उपाय योजना सुचविल्या. यावेळी डॉ. गिरीष ठाकूर अधिष्ठाता, डॉ. रामराव मुंढे हे उपस्थित होते. १३ रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले यापैकी पाच रुग्ण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील तर आठ रुग्ण हे एमआयडीसी मधील कोविड केअर सेंटर येथील आठ रुग्ण आहे असे एकूण 13 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
0 Comments