धक्कादायक: जिल्ह्यात कोरुना रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ ;दिवसातला तिसरा रिपोर्ट
लातूर १८० पैकी १३१ निगेटिव्ह २७ पॉझिटिव्ह १५ Inconclusive व ७ रद्द
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ६९ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून १२ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ८ व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत व एका व्यक्तीच्या स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.दिनांक ५.७.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील २ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सर्वच २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण ८० कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी ३५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज ८ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.आज ४८ वर्ष वय असलेल्या महिला रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व किडनीचा आजार होता व त्या मागील ४५ दिवसापासून डायलिसीस वर होत्या आज त्यांचा उपचारादरम्यान रात्री १०.०० वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.
0 Comments