क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्युनियर काॅलेजचा १२ वी CBSE BOARD परीक्षेचा सर्वोत्कृष्ट निकाल.
श्रेया काळे ९०% सर्वप्रथम, कांचन वर्मा ८६% द्वितीय तर शिवांगी पताळे व अंजली केसगिरे ८३% गुण घेऊन तृतीय येण्याचा मान या मुलींनी मिळवला.यशाची उज्ज्वल परंपरा कायम
अहमदपूर:(प्रतिनिधी) तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्यु. काॅलेजचा १२ वी CBSE बोर्डाचा इ.सन. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला. अशा या यशामुळेच शाळा व काॅलेजने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी कामगिरी केली आहे. क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्युनियर कॉलेज हे मराठवाडा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे मोठे संकूल जीवनकुमार मद्देवाड यांनी उभे केले आहे. या सर्वोत्कृष्ट यशासाठी संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य यांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना मार्गदर्शन, प्रोत्साहन देत राहिले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचा पालक होऊन सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच Motion education pvt. ltd. कोटा राजस्थान येथील शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. हे यश मिळविण्यासाठी शिक्षकांनी सकाळी ५:०० वाजल्यापासून ते रात्री १०:०० वाजेपर्यंत ( २४×७ तास) मेहनत घेतली होती. या घवघवीत यशासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक यांनी देखील आपल्या पाल्ल्याला शाळेतच निवासी ठेवल्याने हे सर्व शक्य झाले आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, प्राचार्य राजेश सर, अकॅडमीक समन्वयक महेंद्र पांडे, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक, पालकांचे अभिनंदन केले.
0 Comments