निलंगा:(प्रतिनिधी) तालुक्यातील केळगाव लांबोटा वनविभागाच्या जवळ जाजनुर झरी परिसरातील शेत शिवारात अंबुलगा बु.सहकारी साखर कारखाण्याच्या पाठीमागे सोमवारी एका हरणाचा गूढ मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.परंतु याची कसलीच कल्पना वनविभागाला माहिती मिळाली नाही.केळगाव लांबोटा परिसरात वनविभागाचे दोनशे हेक्टर वनक्षेत्र आहे.त्यात मोठ्या प्रमाणात हरिण,कोल्हा,रानडुक्कर,लांडगा,असे पक्षी व प्राणी आहेत.वनविभागाला सुरक्षा भीत व तारांचे कुंपण नसल्याने हरणाचे अनेक कळप शिवारात फिरतात त्यात प्रत्येक वर्षी तालुक्यात दहा ते वीस वरण जखमी व मृत्यू पडतात नेमके या हरणाला कोण मारले व कशासाठी मारले समजले नाही परंतु हरणाची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अनेजन असे वन्य प्राणी मारून आपली भूक भागवत असतील अशी पशु प्रेमीकडून बोलले जात आहे? माञ याकडे प्रशासकीय वनरक्षक व वनविभाग अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. मयत हरणाच्या पायाला व डोळ्याला जखम झाली असून मारून खाण्याचा उद्देशानेच या वन्य प्राण्याची हत्या केली असावी असे येथील नागरिकातून बोलले जात आहे. वेळीच अशा लोकावर कडक कारवाई करावी व वनरक्षकांनी वन परिसरात दररोज हजेरी लावावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
0 Comments