मुक्त विद्यापीठाचे ठरले; अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना देणार पदवी
नांदेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणावर निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २२ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षात प्रवेशित असलेल्या अव्यावसायिक शिक्षणक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने निर्णय घेवून परीक्षा न घेता पदवी प्रमाणपत्र देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे़ या निर्णयामुळे नांदेड विभागातील पदवीच्या अंतिम वर्षातील २० हजार तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़
0 Comments