Latest News

6/recent/ticker-posts

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 


मुंबईच्या वांद्र्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास


सरोज खान यांचे आज पहाटे मुंबई दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. त्यांना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली


 


मुंबई: बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान त्यांचे  हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत होता. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.सरोज खान यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना वांद्र्यातील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्या मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही झुंज देत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केले होते. सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरूवात केली. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसेच त्यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार, या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले होते. चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.


Post a Comment

0 Comments