वडवळ:(नागनाथ) दि.१४ येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक त्र्यंबकप्पा गुंडप्पा मोहनाळे (वय-८७) यांचे मंगळवारी (दिं.१४) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दिं.१४) दुपारी येथील बेलपत्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी मुनीर मुजावार आणि तलाठी शंकर लांडगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचे (कै.) मोहनाळे यांनी निजाम राजवटीतून मराठवाडा विभाग मुक्त करण्यासाठी रजाकारांसोबत लढा दिला होता त्यानंतर त्यांचा येथील सामाजिक आणि धार्मिक कार्यातही मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून, परळी येथील विद्यावर्धनी विद्यालयाचे लिपिक बाबुराव मोहनाळे, येथील ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार राजकुमार मोहनाळे आणि फोटोग्राफर चंद्रशेखर मोहनाळे यांचे ते वडील तर वीरयोध्दा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितीन मोहनाळे यांचे ते आजोबा होत.
"मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments