उदगीर: (प्रतिनिधी) मार्च २०२० मध्ये सीबीएसई न्यू दिल्ली बोर्डाने घेतलेल्या परीक्षेमध्ये जयहिंद सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची सलग सहाव्या वर्षी ही शंभर टक्के निकाल प्राप्त करून घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जयहिंद सीबीएसई शाळेतून एकूण २८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ची परीक्षा दिली होती त्यामध्ये चार विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.
सीबीएसई न्यू दिल्ली बोर्डाने जाहीर केल्या निकालात जयहिंदच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश यात सौदागर सलमान बक्शुमियाँ याने ९३. ६० टक्के गुण घेऊन व गणितामध्ये ९९ व विज्ञान मध्ये ९७ गुण मिळवून शाळेमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे. सय्यद सफुरा मैनुद्दीन हिने ९१. ४० टक्के गुण मिळवून द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे, तसेच कुलकर्णी ऋतुपर्ण मधुकर याने ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमधून तृतीय आला आहे. मुचळंबे ओमकार सुर्यकांत हा ९०. २० टकके गुण व गणितामध्ये ९७, सोशल सायन्स मध्ये ९६ गुण मिळवून चैथ्या क्रमांकावर यश मिळवले आहे. तसेच शाळेतील ११ विद्यार्थी हे ८० टक्के ते ८९ टक्के गुण मिळाले आहेत. तर सहा विद्यार्थी हे ७० टक्के ते ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले असुन उर्वरित सात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, संचालक रोहित वागे, शैक्षणिक संचालक संजय हट्टे, शाळेच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य सतीश वाघमारे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद , कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.
0 Comments