पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षरोपनही केले.
चाकुर:(ता,प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार रामचंद्र गुंडरे यांचा वाढदिवस सागरभैय्या होलदांडगे मिञ मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.रामचंद्र गुंडरे यांचा शाल,हार,फेटा ,बांधुन सागर होलदांडागे यांनी त्यांचा सत्कार केला.व नंतर केक कापण्यात आला. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी मास्कचा वापर करावा लागत आहे.त्यांनी आपल्या वाढदिवसां निमित्त स्वखर्चातुन मास्कचे वाटप केले.जनतेमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मास्क वाटप केले. त्याचाच एक भाग म्हणून काळाची गरज ओळखत मास्क वापरणे अत्यावश्यक आहे हे जनमानसात बिंबवण्याकरीता चाकूरचे बीट जमादार रामचंद्र गुंडरे साहेबांनी स्व:खर्चातून मोफत मास्क वाटप केले. यासोबच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण ही केले. सतत वातावरणात बदल होऊन कधी पाऊस जास्त तर कधी कमी यामुळे सध्या निसर्गाचे समतोल बिघडले आहे.अशा वेळी पर्यावरणाचे महत्त्व समाजुन त्यांनी वृक्षरोपण केले व ते संगोपन करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कडव्या शिस्तीच्या पोलिसातील माणुसकीलाचे अनोखे रुप पाहुन त्यांचे सर्वस्तरांतुन अभिनंदन होत आहे.यावेळी सकाळचे बातमीदार संगम जनगावे,सागर होलदांडगे,सुरज शेटे,पुट्टेवाड, चेतन होलदांडगे, आदि सागरभैय्या मिञमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments