Latest News

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ प्रणित वैदयकीय कक्षाच्या राज्यप्रवक्ता पदी डॉ.शेषराव शिंदे यांची निवड


मराठा सेवा संघ प्रणित वैदयकीय कक्षाच्या राज्यप्रवक्ता पदी डॉ.शेषराव शिंदे यांची निवड                       


निलंगा:(प्रतिनिधी/रहीम मणियार) वैद्यकीय सुविधा सर्व समाजातील सर्वसामान्य जनतेपर्यंत देण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कक्षाच्या प्रदेशअध्यक्ष पदी डॉ.रमेश भराटे तर राज्य प्रवक्ता पदी डॉ.शेषराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व डॉक्टर एकत्र येऊन सर्व सुविधांच योग्य नियोजन करून राज्यभर सेवा सुविधा पुरवणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार निलंगा अध्यक्ष प्रमोद कदम सेवा संघाचे तालुकाअध्यक्ष एम.एम जाधव शहराध्यक्ष उद्धव जाधव वैद्यकीय कक्षाचे अध्यक्ष सचिन बसुदे वकीलमंडळाचे अध्यक्ष Adv. तिरुपती शिंदे, सुबोध गाडीवान, उदय निटूर, इर्शाद शेख, मुजीब सौदागर, विनोद सोनवणे,आदींनी या निवडीचे स्वागत केले.


Post a Comment

0 Comments