Latest News

6/recent/ticker-posts

आरोग्य विभागाकडून प्रशासनाने कालन गल्लीतील परिसर केला सील

आरोग्य विभागाकडून प्रशासनाने कालन गल्लीतील परिसर केला सील 


औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) शहरातील कालन गल्ली म्ध्ये राहणा-या एका वृद्ध व्यक्तीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने, बाधित रुग्णांच्या घराचा परिसर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळी सिल केला आहे .त्याची लागण दुसऱ्याला होऊ नये म्हणून दक्षता घेताना पूर्ण परीसर सांनिटाझर ने फवारणी केली जात आहे. औशातील कालन मध्ये राहणा-या एका वृद्ध व्यक्ती चा अहवाल १९ जुनच्या शुक्रवारी संध्याकाळी कोरोना पाॅझिटिव्ह आला असून आरोग्य विभाग आणि अधिका-यांनी तातडीने भेट देत तो परिसर सील केला आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी आ.अभिमन्यू पवार, तहसिलदार शोभा पूजारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर, नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,नगरसेवक मेहराज शेख, संतोष अप्पा मुक्ता आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments