सोयाबीन पिकाचे सरसगट पंचनामे करून शेकऱ्यांना मदत करा - प्रा. सुधीर पोतदार
औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी पेरलेल्या सोयाबीनची उगवण झाली नाही अशा प्रकारच्या ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुक्यात सुरू आहेत तरी प्रशासनाने गाव पातळीवर जावून सरसगट सर्व शेतकरी यांच्या तक्रारी अर्ज घेवून तात्काळ शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करावेत अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात.कारण तालुक्यातील अनेक शेतकरी यांनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावे असे आवाहन कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव यांनी घरगुती बियाणे पेरणी साठी वापरले होते.ते सुद्या उगवले नाही त्यामुळे ते शेतकरी संकटात सापडले आहेत. तरी कृषी विभागाच्या अधिकारी यांना सर सगट सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेब यांनी द्यावे जेणे करुन संकटात सापडलेल्या शेतकरी यांना मदत होईल. कारण त्यांना परत बियाणे घेऊन पेरण्याची परिस्थिती असल्याने ताबडतोब पंचनामे करून मदत करावी काही शेतकऱ्यांची तर सर्वच शेती दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती आहेगाव पातळीवर ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सोयाबीनची उगवण झाली नाही अशा गावोगावच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्ज घेवून सरसगट पंचनामे करावेत व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाकडून मदत मिळेल अशा प्रकारची अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात ही तरी मा. पालकमंत्री यांनी यामध्ये तात्काळ लक्ष वेधून शक्य होईल तेवढे लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा सुधीर पोतदार, एडवोकेट आनंद कुलकर्णी, भाऊराव पाटील, किरणकुमार माने, बिराजदार निलेश व पांचाळ विठ्ठल आदींच्या सह्या आहेत.
0 Comments