घरीच रहा आणि कुटूंबासमवेत करा योगदिन साजरा
पुणे:(प्रतिनिधी/तानाजी मोहळकर) जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने दिनांक २१ जून २०२० सकाळी ६.४५ वाजता केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय नवी दिल्ली व राज्य शासनाच्या सूचनानुसार दिनांक २१ जून २०२० या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील सर्व खेळाडू, मार्गदर्शक व सर्व नागरिक क्रीडाप्रेमी यांना अवाहन करण्यात येते की, कोरोना संसर्गामुळे आपण आपल्या कुटूंबासमवेत घरीच योगदिन साजरा करावयाचा आहे.कोरोना संसर्गामुळे आपण सर्वजन एकत्रित योगदिन साजरा करू शकत नाही तरी सर्वाना जेथे आहात तेथेच सुरक्षित व दक्षता घेऊन योगदिन साजरा करणे तसेच जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालय, पुणे व जागतिक कीर्तीच्या योगपटू श्रीमती पल्लवी कव्हाने या FACEBOOK SOCIAL MEDIA वरुन LIVE योग आसनांचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी यामध्ये सर्वांनी आपल्या कुटूबांसह सहभाग नोंदवावा.खालील लिंक वर आपण LIVE पाहू शकता कींवा JOIN होऊ शकता.
https://www.facebook.com/groups/222441992504642/?ref=share
असे अवाहन जिल्हा क्रीडा आधिकारी विजय संतान व जागतिक कीर्तीच्या योगपटू श्रीमती पल्लवी कव्हाने यांचेमार्फत करण्यात आले आहे.
0 Comments