Latest News

6/recent/ticker-posts

औसा लातूर रस्त्यावर टँकर उलटून एक गंभीर

औसा लातूर रस्त्यावर टँकर उलटून एक गंभीर 


 



औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही कमी असताना किरकोळ अपघाताचे प्रकार घडणे सुरूच आहे शनिवार दिनांक १३ जून २०२० रोजी सकाळी ११,३० सुमारास तेलाचे टॅंकर उलटले असून MH 04 /MY/ 4908 हा टँकर चालकाचा वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे औसा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर उर्दू शाळेच्या जवळ टँकर पलटी झाल्याने चालकास गंभीर मार लागला असून चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते हा अपघात घडल्यानंतर चालकास उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले औसा ते लातूर रस्ता सध्या चांगला असून रस्त्याचे सुरू असलेले कामही बंद असताना हा अपघात झाला आहे.


Post a Comment

0 Comments