Latest News

6/recent/ticker-posts

आधी वृक्षारोपण; मगच बोहल्यावर

आधी वृक्षारोपण; मगच बोहल्यावर 



पर्यावरण पूरक विवाह सोहळा


लातूर(प्रतिनिधी) विकी आणि अंजली मगर हे दोघे आज विवाहबंधनात अडकले. त्यांनी आपल्या विवाह सोहळ्यानिमित्ताने वृक्षारोपण करून नव्या आयुष्याला सुरुवात करून पर्यावरण संरक्षण काळाची गरज हा संदेश दिला. शिवाय, लातुरात गत सहा वर्षांपासून निसर्ग संवर्धन कार्यात सक्रिय असलेल्या वसुंधरा प्रतिष्ठान ट्री बँकेस ११ वृक्ष भेट दिले. लातूरला एक-एक वृक्ष लागवड करणे आणि जगविणे काळाची गरज आहे. अशात, अनेकजण या कार्यात सहभागी होऊन निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी तत्पर आहेत. आपणही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात या कार्याने करावी हा हेतूने विकी आणि अंजली यांनी वृक्षारोपण करून शक्य तितकी झाडं जगविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी विकी यांची बहीण शीतल मगर यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी जगन्नाथ मगर, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, सचिव रामेश्वर बावळे, शहर उपाध्यक्ष रामदास घार, संघटक प्रशांत स्वामी उपस्थित होते. या अनोख्या अन पर्यावरण पूरक विवाह सोहळ्याचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments