उदगीर-शासनाच्या आदेशाला पायदळी तुडवत विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात घालून शाळा भरविण्याचा पराक्रम
उदगीर:(प्रतिनिधी) जगभरात कोरोनाची दहशत पसरली असल्यामुळे जवळपास सपुर्ण जग लाकडाऊन मध्ये आडकले आहे. जमावबंदी आहे. शिवाय देशभरातील शाळा कोरोनाच्या भितीने बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र उदगीरीत चक्क आशा दहशतीच्या काळात शाळा भरवुन शासनाच्या आदेशाला पायदळी तुडवत विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात घालण्याचे काम शिक्षक व संस्थाचालकांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. जर प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली तर राज्य नव्हेतर देशातील पहिली शाळा ठरेल.उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर परिसात आक्षर नंदन शाळा आहे. याशाळेने विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात घालून शाळा भरविण्याचा पराक्रम केला आहे. उदगीर तालुका कोरोना साथीच्या रोगाने त्रस्त झाले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण उदगीर तालुक्यात आहेत. त्यामुळे प्रशासन प्रत्येक पाऊल फुकून टाकत असताना अशा अक्कल शुन्य लोकांनमुळे हा रोग पसरत आहे. स्वताच्या स्वर्थासाठी जनतेचा जिवा धोक्यात घालून शाळा भरविण्याचे धाडस आशी मंडळी करतात. राज्य सरकार शाळा सुरु करण्यासंदर्भात काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार लवकरच काही अटी शर्ती शाळेवर लादत शाळा सुरू करण्यास विचाराधिन आहे. पालक कोरोना मुळे गोंधळलेल्या अवस्थेत असुन मुलांना शाळेत पाठविण्याच्या मानशिकतेत नाहीत. तर दुसरीकडे साम, दाम, दंडचा वापर करीत आक्षर नंलन वन विद्यालय भरवले जात असल्याचे जात असुन शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एका वर्ग तुकडीत ३० ते ३५ विद्यार्थी बसवले जात आहेत. शाळासुरू करण्यांचे कसलेही आदेश नसताना आक्षर नंदनवन शाळा भरवली जातेच कशी हा सर्वात मोठा प्रश्न असुन विद्यार्थी, पालक व जनतेच्या जिवशी खेळणा-या शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यावर कठोर कारवाई करावी आशी मागणी जनता करीत आहे.
0 Comments