शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने मंगरूळ येथे रक्तदान शिबीर
औसा:(प्रतिनिधी/नदीमभाई सय्यद) शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने मंगरूळ (ता.औसा) येथे दि. ६ जून रोजी कल्लेश्वर प्रतिष्ठान व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबीरासाठी उत्स्फुर्तपणे रक्तदान करण्यात आले याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोषअप्पा मुक्ता, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जाधव, माजी सरपंच ईश्वर कुलकर्णी, माजी उपसरपंच काकासाहेब मनाळे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, एकनाथ गायकवाड, भागवत जाधव, शुभम पाटील, यादव भंगाळे, प्रशांत वेदपाठक, अतुल पाटील, अमोल मनाळे, सुरेश तेलंग व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, उपस्थित होते. याचबरोबर आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील संपर्क कार्यालयातही शिवराज्याभिषेक अभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, शंभुराजे भोसले, सदाशिव जोगदंड, संजय मोरे,श्रीराम माने, उमेश बाडगिरे आदी उपस्थित होते.
0 Comments