डॉ.भगीरथी भरत पवार ह्या मुलीचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश
उमरगा:(प्रतिनिधी/वजीर शेख)
"इस संभव विश्व मे असंभव क्या है।"
मनस्थिती चांगली असेल तर परिस्थितीवर मात करता येते हि महन सत्त्यात उतरवून दाखवली. उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे नारंगवाडी येथील शेतकरी भरत नरसिंगराव पवार या शेतकऱ्याच्या मुलीने जिद्द आणि चिकाटी आणि सातत्य च्या जोरावर डॉ. भगीरथी भरत पवार ह्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या निकालात सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदी बाजी मारली आहे. डॉ. भगीरथी भरत पवार यांचे प्राथमिक शिक्षण हे नारंगवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. व इयत्ता पाचवीचे शिक्षण श्री जयराम विध्यालय, नारंगवाडी तर पुढील शिक्षण नवोदय विध्यालय येथे व महाविद्यलयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले आहे. व वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस हे औरंगाबाद येथे झाले आहे. वैद्यकीय अधिकारी हे पद सांभाळून २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, या पहिल्याच प्रयत्नात उपशिक्षणाधिकारी हे पद मिळविले होते. यावरच समाधान न मानता आपल्या मनातील जिद्द व पाहिलेले स्वप्नं सत्त्यात उतरविण्यासाठी आपला संघर्ष जारी ठेवत परत २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेस परत समोरे जाऊन परिक्षा दिली व नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदी मजल मारली डॉ. भगीरथी पवार ह्याच्या ह्या यशामुळे नारंगवाडी व परिसरातील युवक व जनतेत आनंदाचे व चैतन्याचे वातावरण आहे. मला हे यश माझ्या आई, वडील व गुरूजनामुळे मिळाले आहे. असे त्यांनी आवर्जुन म्हणत होत्या निकाल समजताच नारंगवाडी गावात व परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन केले यावेळी नारंगवाडी परिसरातील प्रसिद्ध व्यापारी किसनराव मुगळे, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष मेजर दयानंद पवार साहेब,राजूनाना चव्हाण, गोपाळ आष्टे सर, बाबळसूर येथील पुणे येथे स्थायीक असलेले युवा उध्योजक रामभाऊ कारभारी, नारंगवाडी सेवा समुहाचे अध्यक्ष पत्रकार विठ्ठल चिकुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते विकिन सांगवे, तुकाराम चव्हाण यांनी डॉ. भगीरथी पवार व त्यांच्या आई,वडिलांचा सत्कार करुण त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments