Latest News

6/recent/ticker-posts

रोड राॕबरी प्रकरणात एकाला दहा महिन्याची सक्तमजूरी, पाचशे रूपये दंड

रोड राॕबरी प्रकरणात एकाला दहा महिन्याची सक्तमजूरी, पाचशे रूपये दंड


निलंगा सञ न्यायालयाचा निर्णय, आरोपीवर आहेत अनेक गंभीर गुन्हे. 


निटूर:(प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या बुजरूकवाडी पाटीवर झालेल्या रोड राॕबरी प्रकरणात एका आरोपीला दहा महिन्याची सक्तमजूरी व पाचशे रूपयाचा दंडाची शिक्षा निलंगा जिल्हा सञ न्यायालयाने दिली असून यातील एक आरोपी फरार असून शिक्षा झालेल्या आरोपीवर पंधरा ते वीस असे अनेक गंभीर गुन्हे जिल्हाभरातील पोलिस स्टेशन मध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दि. २९ एप्रिल २०१९ रोजी जावेद शरफूद्दीन शेख धंदा मजूरी रा. दापक्याळ ता. चाकूर हे आपल्या पत्नी समवेत दुचाकीवरून नातेवाईकाकडे शिऊर आनंदवाडी येथे गेले होते. दिवसभराचे काम आटोपून जावेद शेख आनंदवाडी हून आपल्या दापक्याळ या गावी निघाले राञी दहा च्या दरम्यान ते बुजरूकवाडी पाटीजवळ आले असता पाठीमागून आरोपी हसन जमीर शेख रा. देवंग्रा रोड नळेगाव व इस्माईल उर्फ बाबाराव पठाण रा. लिंबाळवाडी रोड ता. चाकूर हे दोघे दुचाकीवरून आले व जावेद शेख यांच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देवून गळ्यातील पाच ग्रॕम सोन्याचे मनी तसेच पाच ग्राम चे कानातील सोन्याचे झुमके व रोख बाराशे रूपये एवढा ऐवज जबरदस्तीने लुटला व चाकूचा धाक दाखवून निघून गेले सदरील घटना निलंगा निटूर रोडवर वर्दळीच्या ठिकाणी घडली असल्याने त्यावेळी निटूर व परीसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. भर रस्त्यावर लूटमार झाल्याने जावेद शेख यांनी निटूर पोलिसामध्ये या संदर्भात फिर्याद दिली होती त्यामुळे दोन्ही आरोपी विरोधात गुन्हे दाखल झाले होते. सदरील गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पन्हाळर यांनी केला होता व त्या नंतर त्यांची बदली झाली होती त्यानंतर सध्या निटूर येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक मलय्या स्वामी यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या व यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला माञ एका आरोपीला पकडून तपास अधिकारी स्वामी यांनी निलंगा न्यायालयात दोन्ही आरोपी विरोधात आरोपञ दाखल केले होते त्यावरून निलंगा न्यायालयाने एकाला दहा महीन्याची सक्त मजूरी व पाचशे रूपयाचा दंड शिक्षा म्हणून केली याच गुन्ह्यातला एक आरोपी अजूनही फरार असल्यामुळे त्याला शिक्षा होवू शकली नाही दरम्यान या प्रकरणातला आरोपी हसन शेख हा रेकाॕर्ड वरचा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्हाभरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्ह्याची नोंद असून इतर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन मध्ये ही गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले .


सदरील प्रकरणामध्ये दोन आरोपी असून एका आरोपीला शिक्षा झाली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे शिक्षा झालेल्या हसन शेख याच्यावर जिल्हाभरातील पोलिस स्टेशन मध्ये अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून सार्वाधीक जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत तसेच बुजरूकवाडी पाटी येथे घडलेल्या लूटमारी मध्येही आरोपीने चोरीची दुचाकी वापरल्याची माहीती तपासीक अधिकारी मलय्या स्वामी यांनी दिली.


Post a Comment

0 Comments